STORYMIRROR

Vineeta Deshpande

Fantasy

4  

Vineeta Deshpande

Fantasy

माय

माय

1 min
280

तुझं रोज रोज तेच जगणे 

या जगण्याच्या धडपडीत

कित्येक क्षण येतात आणि जातात

किती सुखाचे, किती दु:खाचे

तू हिशोब कधी ठेवत नाही


पोटासाठी रोजची धावपळ

या धावपळीत मला हवा असतो

काही क्षणांचा विसावा, 

हवी असते साथ मायेची

आणी तू ती कधी सोडत नाही

 

रात्रीच्या कुशीत शिरण्याआधी 

जेव्हा तू मला तुझ्या पंखाखाली

अलगद ओढून घेतेस, तेव्हा

आशेच्या ठिणगीत भयाण काळोख

वितळून जातो.


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Fantasy