मैत्रेय
मैत्रेय
1 min
201
मैत्रीचा गोफ अन त्यात गुंफलेले
अवखळ क्षण म्हणजे
शिदोरी असते,
ती जन्मभर
पुरवायची असते.
मैत्रीचे बीज जेव्हा अंकुरते
हिरवं कोवळी पाने
जेव्हा बहरतात,
ती हृदयात
रुजवायची असतात
मैत्री एक खळखळून वाहता झरा
निखळ निर्मळ पाण्यात
बेभान क्षण,
ती आयुष्यात
वेचायची असतात
मैत्रीत गुंतलेले रुसवे फुगवे
निरागस क्षण म्हणजे
आठवणी असतात,
त्या मनात
जपायच्या असतात
