तहान
तहान
1 min
328
माझी माती माय
अंगभर भेगाळलेली
कवापासून तहानलेली
आस बगा ढगाळलेली
माझी माती माय
रडे धाय मोकलून
वाहे पानी डोळ्यातून
आला पळत मेघराज
माझी माती माय
चिंब चिंब भिजलेली
बीजे सारी अंकुरली
हिरवळीने नटललेली
म्हने माझी माती माय
एक गूज सांगते ऐक
शिवारात बांध शेततळे
शोषखड्डे चोहीकडे
आज्ञा पडत्या फळाची
जमले सारे गावकरी
तळ्यात साचलं पानी
मुरलं खोलवर खाली
आता भेगाळणं नाय
आता पोळणं नाय
आता दुष्काळ नाय
आता काळजीच नाय
आमच्या साऱ्यांच्याच हाती
आता ओलसर माती
आता ओलसर माती
