STORYMIRROR

Vineeta Deshpande

Tragedy

3  

Vineeta Deshpande

Tragedy

बेधुंद

बेधुंद

1 min
226

जीवनाचा प्रवास खडतर

कर्तव्य अन् कर्म अविरत

सुख-दु:खाचे घोट रिचवत

चालत जातो मी अविरत


असाच एकदा अचानक

आनंदाचा डोह गवसतो

या डोहात मी तुडुंब भिजतो

मोहाचा तो क्षण थबकतो


या क्षणात मी जगून घेतो

बेधुंद होतो, या धुंदीत

मी गातो जीवनगाणे.

गाणे संपते डोह सुकतो


परत प्रवास माझा

आनंदाच्या डोहाच्या शोधात.

बेधुंद धुंदीच्या शोधात.


विनीता देशपांडे



రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Tragedy