STORYMIRROR

Vineeta Deshpande

Inspirational

4  

Vineeta Deshpande

Inspirational

कोऱ्या कागदावर

कोऱ्या कागदावर

1 min
540

व्यवहार नात्यात

व्यवहार जगण्यात,

तोलणे इथे सारे पैशात. ।।१।।


सदा धावपळ अन् घाईत

माणुसकी इथे

हरवली माणसात. ।।२।।


लिहावे असे उत्कट

अन भेदून टाकावे

जाणीवा ज्या बोथट ।।३।।


कोऱ्या कागदावर

उमटू दे आता

शब्द तुझे उत्कीर्ण ।।४।।


घे लेखणी हातात

भिजवून उद्विग्न शाईत

लिही भेदक अन उल्लाट ।।५।।


होतील जाणीवा जागृत

होईल आत्मा जागृत, अन्

माणसातील माणूसपण ।।६।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational