अफवांचे पीक
अफवांचे पीक
कसे सांगू तुला
जात माणसाची
क्रुरता अंगी ही
जशी सैतानाची
येथे फक्त चाले
राज्य अफवांचे
मेंदू किडलेले
दृष्ट राक्षसांचे
दया क्षमा शांती
नाही त्यांच्या गावी
मानवतेला ही
लागली वाळवी
झुंडी पिसाळली
क्रुर श्वापदांची
लचके तोडती
दीन दुबळ्यांची
नाही सारासार
आचार विचार
माता बालकांना
केले निराधार
पोरं चोर टोळी
भीती अनाठायी
अफवा आधार
शंका त्यांच्या ठायी
किती पेराल हे
अफवांचे पीक
राईनपाड्याला
घालू नका भीक
