भास तुझा होतांना
भास तुझा होतांना
मन झंकारते
भास तुझा होताना
पूर ओसरताना
नयनात.......!
सभोवताली पसरे
तुझ्या तनाची दरवळ
उठते वादळ
ह्रदयात........!
मृगजळाचा सागर
तुझा केवळ आभास
मनी भास
सदोदित........!
चांदणी रात्र
तुझा हात हातात
होतो घात
स्वप्नात......!
तुझी माझी
घडून यावी भेट
उतरावी थेट
काळजात......!

