STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Romance

4  

गोविंद ठोंबरे

Romance

अजूनही मन......

अजूनही मन......

1 min
42K


अजूनही काळजात दुःख साठलेलं आहे,

कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन बसलेलं आहे.

मनाच्या खोल गाभाऱ्यात लपलेलं आहे,

कंठाच्या दाराशी येऊन भरलेलं आहे.


अजूनही मन तिथेच भरकटत आहे,

वास्तवाशी उगीच हुज्जत घालत आहे.

विस्कटलेल्या स्वप्नांना कवटाळत आहे,

भिजलेल्या पापन्यांशी सर्वकाही पाहत आहे .


अजूनही मन तितकंच वेडं आहे,

सुन्या सुन्या मैफिलित एकटच गात आहे.

अंगणाशी जाऊन वेड्यागत वाट पाहत आहे,

हरवलेल्या आपल्या माणसाला शोधत आहे.


अजूनही मन होतं तसंच आहे,

कालच्या आठवणीत आज जगत आहे.

एकटच असून माणसात वावरत आहे,

पण मनातल्या मनात मरत आहे.


अजूनही मन गप्प गप्पच आहे,

कदाचित कुठेतरी आडोसा शोधत आहे.

बावरल्या जीवास सावरतं करत आहे,

पण तरीही फिरून तिथेच येत आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance