STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Inspirational

3  

गोविंद ठोंबरे

Inspirational

आधारवड

आधारवड

1 min
607

आभाळ भेदून बरसणारी मोत्यांची फुलं,

प्रकाश धारा ओंजळीत घेऊन उतरणारी किरणं,

बेफिकीर असतात ते फक्त त्या मातीमुळेच!

कारण.....,

आधार होऊन कवेत घेणारी सृष्टी

माती होऊन मायचा

अन् आभाळ पांघरून बापाचा

वारसा चालवत असते!

म्हणूनच....,

सकाळी निर्धास्त झेपावणारी सूर्य पिलं

सांजवेळी रस्ता न चुकता घरटं कवेत करताना;

हात पसरवून वारसा लाभलेल्या फांदीला 

हक्काचा "आधारवड" समजतात!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational