STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Abstract

3  

गोविंद ठोंबरे

Abstract

चांदवा..

चांदवा..

1 min
300

काळजात उन्हाळा

अन पाझळतो जीव आहे

म्हणूनच त्या सावलीला 

पोळण्याचा खेद नाही...


माणसाच्या खोल मनाला

माणसाचा त्रास होतो

म्हणूनच त्या आत्म्याला

देह होता येत नाही...


गोठलेल्या भावनाही 

भावनाहीन होत आहे

म्हणूनच त्या वेदनेला 

स्पंदनांचा वेध नाही...


लादलेल्या बंधनांना

अबोल शब्द बोचणारे

म्हणूनच त्या बोलक्यांना

ऐकण्यास वेळ नाही...


अंतरीच्या चांदव्यात

चंद्र रोज पाहतो मी

म्हणूनच त्या पौर्णिमेचे

दाखले मी देत नाही...


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Abstract