शब्द
शब्द


शब्दांना शब्दात कसे वर्णू मी ?
शब्द मोगरा, शब्द अबोली
शब्दांना सुगंधात कसे माळू मी?
शब्द अलगद, शब्द अलवार
शब्दांना ओठात कसे गाऊ मी?
शब्द अवखळ,शब्द बालीश
शब्दांना काव्यात कसे लिहू मी?
शब्द निर्दोष ,शब्द अजाण
शब्दांना बंधन कसे देऊ मी?
शब्द कोमल,शब्द विशाल
शब्दांचे आकाश कसे स्पर्शू मी?
शब्द चंचल,शब्द सरल
शब्द बोलके कसे करु मी?
शब्द रंगीत,शब्द मनोहर
शब्दांना श्रावणात
कसे भिजवू मी?
शब्द खंबीर,शब्द बधीर
शब्दांचा आधार कसा होऊ मी?
शब्द प्रांजळ,शब्द प्रामाणिक
शब्दांना शब्दात कसे फसवू मी?
शब्द निर्मळ,शब्द सोज्वळ
शब्दांना प्रेमळ कसे म्हणू मी ?
वर्णावया शब्द ,शब्द न मिळे जर
सुगंधी भावार्थ ......
शब्दांचे अनुभवले मी !!!