Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Satish Wadekar

Abstract

4  

Satish Wadekar

Abstract

कोण असशी तू

कोण असशी तू

1 min
524

कोण असशी तू

तू शापित कुणी यक्ष भूवरी आला ।

अलगद अवचित मित्र माझा झाला ।।

तू गंधर्व किंवा देवदूत अगदी ।

अवनत कोणी राजपुत्र मागधी ।

सांग तुज शापिले कुणी कधी ।

सांग कसा तू या देही, या देशी पातला ।।

ऋषीने कोण्या शापिले दर्पाने ।

वा दंशिले तुज कलीसर्पाने ।

की तूच नीच असशी कर्माने ।

सांग का म्हणुनी तुजवरी दैवघाला ।।

का पुण्यपुरुष तू असशी ।

जमवून सत्कर्माच्या राशी ।

सुरांतून त्या पेरत जाशी ।

जगात या सद्धर्म दृढ करण्याला ।।

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract