STORYMIRROR

Satish Wadekar

Romance

3.4  

Satish Wadekar

Romance

धुके

धुके

1 min
12.7K


साचले हे धुके दाट, साजणवाट लोपली ।

स्वकाया गिरिराजाने, गर्दरंगात झाकली ।।


कुंद वारा उभा स्तब्ध, मिठी बेधुंद घातली ।

प्यायली आसमंताने, ही शीतप्रीत चाखली ।।


दवात ओल सांडूनी, रानारानात गोठली ।

हिरे अनंत होऊनी, पानापानात साठली ।।


प्रीती पाशात न्हाऊनी, धरणी चिंब लाजली ।

प्रियकरास चुंबूनी, ही शुभ्रशाल ओढली ।।


नव्याने आस भेटीची, मनात आज जागली ।

निसर्ग-रीत पाहूनी, अपुली प्रीत रंगली ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance