शिवजन्म (सभासद बखर उल्लेख)
शिवजन्म (सभासद बखर उल्लेख)
1 min
867
कुसुमाकर रंगला, सारंगमय धरा ही ।
सारंग कीर्तनी दंग, जनसंघ लक्ष राही ।।1।।
हारी हलाहल ताप, तो तृष्णाताप न हारी ।
स्वर्गजल अवतारी, स्वभक्ता परि न तारी ।।2।।
भगिरथापरि राजा मालोजी करता झाला ।
सरोवर जलमय होई, तीर्थ जन प्याला ।।3।।
भक्तश्रेष्ठ नरेशास, उमेश प्रसन्न होई ।
मालोजीस वदे स्नेहे, दृष्टांत त्यास जो देई ।।4।।
भ्रष्टविली बहुतीर्थे, दुष्ट म्लेंच्छासि माराया ।
राया तव गृहीं येतो, सकलजन ताराया ।।5।।
प्रपुत्र रूप म्हणुनी, जो तांडव करायाचा ।
शिवनेरीस श्रीशंभू, जन्म घे शिवरायाचा ।।6।।