STORYMIRROR

Satish Wadekar

Others

4  

Satish Wadekar

Others

सॅन्टाक्लॉजची खंत

सॅन्टाक्लॉजची खंत

1 min
447

क्षमा कर बाळा 'भेट' न देऊ शकलो ।

मी आलो जरी, तुज नाही भेटू शकलो ।।


बर्फाळ पर्वतांना ओलांडून ।

हाकीत रथ हिमप्रपातातून ।

बालगोपालांच्या इच्छा पुरवून ।

मी आलो जरी, तुज नाही भेटू शकलो ।।


पोशाख लेऊन मऊमऊसा ।

परीकथेतील देवदूतासा ।

बालरंजनाचा घेत वसा ।

मी आलो जरी, तुज नाही भेटू शकलो ।।


कुणा दिली रंगीत खेळणी ।

कुणा दिले इच्छिले जे मनी ।

स्वप्नात करीत मधु-पेरणी ।

मी आलो जरी, तुज नाही भेटू शकलो ।।


हर्षित केले सर्व जण मना

समजावू कसे तुझ्या बालमना

मृतास मी ना देऊ शके जीवना

म्हणूनी सांगतो, तुज नाही भेटू शकलो


बाप तुझा तो मृत संगरी ।

इच्छा तुझी त्या आणण्या जरी ।

ती ना करू शकतसे पुरी ।

जे मागसी तू, ते नाही देऊ शकलो ।।


जाऊन मागेल देवापाशी ।

तुजसाठी सुखाच्या थोरल्या राशी ।

परतेल तुजसाठी पुढल्या वर्षी ।

न म्हणेल तेव्हा, तुज नाही भेटू शकलो ।।


Rate this content
Log in