आत्मोद्धाराची प्रार्थना
आत्मोद्धाराची प्रार्थना
आत्मोद्धाराची प्रार्थना
(वृत्त - भुजंगप्रयात)
बहू कंटकेही जरी येत पायी ।
मला मार्ग लाभो सदा सत्य न्यायी ।
कटूतेत माझ्यात माधुर्य राहो ।
अहंता मनाची जळो नष्ट होवो ।।1।।
पुसावीत मी आसवे गांजल्यांची ।
भरावीत मी जीवने वंचितांची ।
धरो दीन लोकांस आधारछाया ।
सदाचार पुण्ये करो धन्य काया ।।2।।
मनी प्रेम राहो, गळो द्वेषबुद्धी ।
तुझ्या प्रेरणेने, मिळो चित्तशुद्धी ।
तुझ्या आशिषे ज्ञान दे शारदा माँ ।
पडो कार्य माझे स्वदेशास कामा ।।3।।