"कोण तू ?" (बालगीत)
"कोण तू ?" (बालगीत)


माझ्याच मागून येत होती
पुढं ही जात नव्हती अन
मागं ही राहत नव्हती
माझ्याच बरोबरीनं चालत होती
आहेस तरी कोण तू ?
माझाच पाठलाग करत होती
दुपारीचं गायब होत होती
मागेही अन पुढेही दिसत नव्हती
माझ्याच पायात लपत होती
आहेस तरी कोण तू ?
माझ्याच बरोबरीनं खेळत होती
वळेल तेव्हाच वळत होती
वाकेल तेव्हाच वाकत होती
अंधारातच विलीन होत होती
आहेस तरी कोण तू ?
डोकावेल तेव्हाच डोकावत होती
हसेल तेव्हाच हसत होती
समोर पाहिलं तर दिसत नव्हती
लगेच मागे लपत होती
आहेस तरी कोण तू ?