Aparna Parelkar

Abstract


4  

Aparna Parelkar

Abstract


"शब्दांची ओंजळ"

"शब्दांची ओंजळ"

1 min 21.2K 1 min 21.2K

मनातील भावना एकवटूनी,

भरली शब्दांची ओंजळ |

त्याच शब्दांनी दिधले मजला,

काव्य रचिण्या बळ ||१||

त्या ओंजळीतले शब्दाचे मोती,

तुमच्याच मनीचा ठाव घेती |

लहान थोर आई वा बाबा ,

जणू सारेच तुम्हासवे बोलती ||२||

रवि, शशी, नभ अन् खग सारे ,

तव अंतरीचे मज भाव सांगती |

देऊनी त्यास मग रुप शब्दांचे ,

अलगद ठेविले ओंजळीत ते मोती ||३||

प्रेम, दुःश्वास,स्वार्थ, निःस्वार्थ ,

सर्वांना वेचुनि माळ मी विणली |

काव्याची झालर लावुनी त्याला ,

ओंजळीत माझ्या ठेविली ||४||

ह्या माळेतील प्रत्येक मोती,

मम अंतरीचे भाव बोलती |

तुमचेही मन बोलेल कदाचितं ,

उघडले जर ओंजळीतले मोती ||५||


Rate this content
Log in

More marathi poem from Aparna Parelkar

Similar marathi poem from Abstract