आयुष्य
आयुष्य

1 min

14.9K
आयुष्य हे गड्या
भारी नक्षी आहे
त्याला जीते जागते
मन हे साक्षी आहे
भेगाळली जमीन
तीले आस पावसाची
मग मदमस्त यौवणाचा
हा नुसता कहर आहे
निर्विघ्न असावा देह
ना लेस व्यसनांचा
मग आकाश उंचउंच
सारे मुठीत आहे
अढळ व्हावी मनिषा
ना फितुर व्हावी इच्छा
मग सादगी सुगंधी
श्वासात भास आहे
होते जरी विनाशी
कधी मन हे शेवटी
मग माझ्याच रचनेचा
आरसा चकोर आहे