गाणं उरात वाजते
गाणं उरात वाजते
1 min
28K
गाणं उरात वाजते
धरा नटली सजली
गाणं ओलगार मनी
तरू टिपूर दिसते
झिम झिम्माडल्या रानी
येते धुंद मंद सर
वारा उफणते पाणी
वाट पाण्यात भिजली
गाते खळखळ गाणी
लांब लांब फांदीवर
कुठं आडोशाला दूर
दाटे तरार पंखात
उभ्या देही नवा सूर
आता काजळते सांज
घर स्वप्नात सजते
दिवा जळता झीजता
गाणं उरात वाजते
