Arun V Deshpande

Abstract

1.3  

Arun V Deshpande

Abstract

कविता - मी

कविता - मी

1 min
14K


दोन्ही गुडघे

पोटाशी दुमडून घेत 

आताशा रोजच 

आरामशीर बसून असतो 

सुस्त दिवसाच्या सोबत मी

कळून आलय आता

चुकलं होतं कुठे काय काय

दिवस गेले - ती वेळही गेली, 

आवंढे गिळत ,चरफडत तसाच

बसून राहतो मी

चुकाच चुका किती त्या

कधी कुठे चुकले ?

आठवुन आठवून

मनातल्या मनात 

स्वतःशी बोलत असतो मी

काळोख, एकांत, वनवास

एकात एक मिसळून गेलेत

उजाडणाऱ्या नव्या दिवसात

ढकलत राहणार माझेच आयुष्य 


Rate this content
Log in