Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

सर्कस

सर्कस

1 min
147


नानाविध कसरती विचित्र

चमत्कारिक कोलांट उड्या

पाहण्या सर्कस थरारक ही

पडती सान-थोरांच्या उड्या

उंच उंचीवरचे झुलते झोके

गरगर गरगर घुमणाऱ्या

फटफटीचा मौत का कुव्वा

पाहुनी मग गरगरते डोके

जोकरची फजिती पाहून

लोकांना खळखळून हसू येते

विदूषक असे हुकमी एक्का

सर्कस त्याच्यावर तर चालते

भवतालीची दुनिया आपली

जन हो एक सर्कसच आहे

चढवून मुखवटे रोज नवे

विदूषकाचे जगणे भाग आहे


Rate this content
Log in