लगाम
लगाम
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
मन सैरभैर
करा एक काम
लावा जोर
खेचा लगाम
धावत नाही मग
मन इकडे तिकडे
मुकाट येते परत
पुन्हा घराकडे
सोपी नाही बरे
गोष्ट कठीण ही
परीक्षाच आहे
मोठी अवघड ही
काळजी घ्यायची
आपण आपली
कुणाकडून ना
अपेक्षा कसली
आपण आपले
मदतगार व्हावे
लगाम आपले
आपल्या हाती हेच खरे