कविता - शांतता
कविता - शांतता
1 min
12K
कुठेच गेलेली नाही शांतता
कलकलाट, गोंगाट, आवाज,
ध्वनी-प्रदूषण, किती भडिमार
करतो आपण माणसे सतत
म्हणून
नाही जाणवत आताशा
कशातच शांतता..
हरवून बसलोय आपणच
आपल्या मनाची शांतता
तीच नसेल आत बिलकुल
तर
कुठेच जाणवणार नाही
शांतता....