रंगोत्सव हा
रंगोत्सव हा
1 min
237
रंग सारे हे किती अनोखे
रंगाने येतसे रंगत किती
फिके रंग सारे जाती उडुनी
रंगांचे रूप हे किती अनोखे ...!
प्रत्येकाची आवड निराळी
हर रंगांची ती छटा निराळी
आवडे जो रंग ज्याला ज्याला
रंगुनी तो त्या रंगात जाई ...!
धवल शुभ्र , निळा आकाशी
मोहक गुलाबी , हिरवी हिरवाई ,
धम्मक पिवळा ,रंगीत अपूर्वाई
इंद्रधनूची मनोरम खुलवाई...!
सण होळीचा उत्सव रंगांचा
एकतेत बघावा रंग सर्वांचा
रंगांची करु या बरसात नि
करू या सण साजरा रंगांचा ...!