मराठी भाषा दिन माझी मराठी
मराठी भाषा दिन माझी मराठी
मराठी आपली मायबोली
सर्वांमुखी असावी हीच बोली
त्रिखंडात दुमदुमत ठेवू सारे
साहित्य रत्नांची मराठी बोली ।।
कवी लेखक तुम्ही दूत मराठीचे
गीत गौरवाचे तुम्ही गावे सदा
वाचा लिहा, बोला, सांगा जना
रसाळ बोली भाषा ही मराठी ।।
अमृता समान आपली मराठी
माऊलीने जगाला हे सांगितले
करू पोषण आता मराठी मनाचे
अमृत प्राशन करु या मराठी ।।
आजचे पालक असुद्या ध्यानी
नव्या पिढीच्या ठसवा हे मनी
संस्कार धन आहे ही मराठी
सांभाळू सारे ही मायमराठी ।।