बोलत नाही कधीच ती
बोलत नाही कधीच ती
1 min
438
ती एक अबोली नयन बोलकी
ती सांगे असेच नेहमी बोलत नाही कधीच ती
न सांगता समजून घे शब्दात काय रे सांगणे
डोळ्यातले ओळख म्हणे बोलत नाही कधीच ती
पदर नाजूक बोटात अस्फुट स्मित ओठी
झुकलेली नजर ती बोलत नाही कधीच ती