गवळण
गवळण
कुठं चाललीस नटून
जरा घेऊया भेटून
कुंज वनी वाट बंद
केली गं कान्हानं ।। धृ।।
तुझ्या डोईवर दुधाचा माठं
सखे अवघड वळणाची वाट
तोल सांभाळ जरा
रस्ता नाही बरा ---- कुठं
तुझ्या कानात झुंबर डोलं
वाट चालतांना जराशी बोलं
हळू बोल गं जरा
समाज नाही खरा ---- कुठं
तुझ्या गळ्यात मोत्याचा हार
कशी निघाली पाण्याला नार
पदर सावर जरा
ताल नाही बरा ---- कुठं
म्हणे गवळण गोकुळची राधा
नका लागू या विजूच्या नादा
नाद नाही बरा
चला जाऊ घरा ---- कुठं