राजकारण
राजकारण


मोठ्या विश्वासानं तुम्हाला
मतदारांनी निवडून दिलं
तुम्ही खुर्चीच्या लालसे पायी
महाराष्ट्राचं पुरं वाटोळं केलं ।।
परतीच्या पावसानं पुर्ण
बळीराजा उध्वस्त झाला
घोषणा तुमच्या ऐकून
झोपेतून जागा झाला ।।
कोणता ही असो पक्ष
सारे एकाच माळेचे मणी
कुणाचं काय व्हायाचे होवो
आपलीच भरतात गोणी ।।
मतदान तुम्हाला करुन
जनतेचं काम फसलय
मुख्यमंत्रीपदाच भूत
तुमच्या डोक्यात घुसलय ।।
मी पुन्हा येईल पुन्हा येईल
भलतेच तुम्ही ओरडले
खरं सांगू मुख्यमंत्री साहेब
तुम्ही तिथंच अवघे भरडले ।।
पद लालसे पोटी तुम्ही
भले भले मार्गी लावले
तुमच्या गर्विष्ठपनाला
हेच राजकारण भवले ।।
याला म्हणतात राजकारण
नाही कोणाचा कोणाला मेळ
किती ही पक्ष बदलले तरी
नाही कुठलाच जमणार खेळ ।।