Travel the path from illness to wellness with Awareness Journey. Grab your copy now!
Travel the path from illness to wellness with Awareness Journey. Grab your copy now!

Vijay Sanap

Romance Others

3  

Vijay Sanap

Romance Others

प्रेम

प्रेम

1 min
455 खुप प्रेम आहे तुझयावर पण

ते तुला कधी कळलंच नाही

जीवाला जीव मिळेल असं

नातं कधी जुळलंच नाही --- ।।धृ ।।

रातराणी उमलावी तशी उमलतेस तू

मनात फुलतांना मनापासून दरवळतेस तू

पण खरं सांगू? मला खूप आवडतेस तू

हे सांगायला सखे आजवर कधी जमलंच नाही ----- ||

खूप समजावतो माझ्या मनाला

पण मन तयारच नाही मानायला

मनातल्या आठवणी मनात विसरायला

खरंच सखे आजवर हे पटलंच नाही ------- ||

रानावनात भटकत होतो

शोधत तुझ्या पाऊल खुणा

जगणे आता कठीण झाले 

प्रिये सखे तुझ्या विना

तुझ्यावर इतका आसक्त झालो

सखे कधी कळलेच नाही||


तू दिसतेच छान, तू हसतेस छान

नाते जुळण्या उपाय छान

एकच आहे रामबाण

शुभ मंगल सावधान

जे आजवर कधी वळलंच नाही ----||Rate this content
Log in