Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Vijay Sanap

Tragedy


3  

Vijay Sanap

Tragedy


दु:खाणी दिवाळी

दु:खाणी दिवाळी

1 min 223 1 min 223


( अभंग रचना )

माय बापा विना / नाही रे दिवाळी

घालू मी ओवाळी / येथे कुणा ||

माय माझी करी / मेथीचे रे लाडू

नाही कधी कडू / लागे मज ||

भाऊबीज दिशी / माय लावी कुंकू

बाळा नको टाकू / मज काही ||

दिवाळीचा सण / नाही झाला गोड

मायीची रे ओढ / लागे येथे ||

कशी ही दिवाळी / बहिण सासरी

नाही रे माहेरी / माय माझी ||

कधी येणार तू / आमच्या भेटीला

अश्रु ही आटला / डोळ्यातला ||

तुझ्या विना आम्हा / छळतो गं राज्या

कशी करु मज्या / सांगा आता ||

कविता लिहिता / आले डोळ्या पाणी

नाही येथे कोणी / माय माझी ||

आठवण येता / ओले झाले डोळे

आसवं ही गळे / नेत्रातून ||

विजू तुझा टिपे / मनातल्या ओळी

दु:खाची दिवाळी / कशी सांगू ||


Rate this content
Log in

More marathi poem from Vijay Sanap

Similar marathi poem from Tragedy