Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Vijay Sanap

Others


3  

Vijay Sanap

Others


येईल दिवाळी

येईल दिवाळी

1 min 309 1 min 309

येईल दिवाळी

सजवू घराला

आनंदीत सारे

तोरण दाराला ||

सजली रांगोळी

अंगण फुलले

दिवाळीच्या सणा

घर ही खुलले ||

येईल दिवाळी

पणती लावूया 

ज्योती प्रकाशाने

उजळु दुनिया  ||

येईल दिवाळी

आस माहेराची

बहिण पहाती

वाट मुऱ्हाळ्याची ||

येईल दिवाळी

नवी साडी चोळी

बंधुराया माझा

घालीन ओवाळी ||

येईल दिवाळी

चला मामा घरी

आनंदात करु

दिवाळी साजरी ||

सुगंधी उटणे

लावून अंगाला

मोती साबनाने

आंघोळ भावाला ||

टिळा कुंकवाचा

बहिण लावती

आयुष्य भावाचे

देवाला मागती  ||


Rate this content
Log in