STORYMIRROR

Vijay Sanap

Tragedy Inspirational

4  

Vijay Sanap

Tragedy Inspirational

आली दिवाळी

आली दिवाळी

1 min
408

आली  दिवाळी

नको आई कपडे

सैनिक सीमेवर

फिरतात गं उघडे ।।

नाही उन वारा

नाही लागत थंडी

सदा असतात ते

तोफेच्या तोंडी ।।

त्यांना कधी आई

असती गं दिवाळी

कोण गं त्यांची

करते ओवाळी ।।

कसली आली पणती

अन् कसला गं दिवा

डोळ्यात तेल घालून

करतात देशाची सेवा ।।

आली  दिवाळी

कसलं त्यांना उटणं

कोठे असेल ताई

कसं होईल भेटणं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy