STORYMIRROR

Vijay Sanap

Others

2  

Vijay Sanap

Others

रणरागिणी

रणरागिणी

1 min
333

महाराष्ट्राची रणरागिणी

पंकजा ताई

नाव पित्याचं करुन मोठं 

आकाशाला नेई ।।१।।

शेतमजूर ऊसतोड कामगार

तुझ्या पाठीशी राही

भोळी भाबडी जनता तुला

खरं प्रेम देई  ।।२।।

संघर्षाची काढून यात्रा

महाराष्ट्र पिंजला

राज माता जिजाऊच्या

सिंदखेडराजाला ।।३।।

साहेबांच्या पावलावरती

ठेवले पाऊलं

युतीच्या त्या सत्तेसाठी

कमळ फुलवीलं ।।४।।

झुंज देण्या दुश्मनाशी

हाती घेऊन तलवार

गरीबांच्या भल्यासाठी

झाली घोड्यावर स्वार ।।५।।

सुख दु:खाच्या संकटाला

धाऊन येई

दीनदुबळ्या गरीबांची

तुच खरी आई  ।।६।।

दुसऱ्याच्या त्या हट्टा पायी

गड भगवान सोडला

स्वत:च्या त्या हिमतीवर तू

भक्तीगड उभा केला ।।७।।

उपेक्षितांच्या कल्याणासाठी

अहोरात्र झटली

अंधाराला मागे सारुन

ज्योत पेटवली ।।८।।

धन्य धन्य ताई तुझे

थोर उपकार

बंधू तुझ्या पाठी उभे

महादेव जानकर ।।९।।

महाराष्ट्राची वाघीण म्हणून

नाव तुझे गाजे

स्टेजवरल्या डरकाळीनं

आसमान गर्जे ।।१०।।

आठवण येता साहेबांची

अश्रू वाहतात

मुंडे साहेब हेच आमचे

खरे दैवत ।।११।।

विजू सानप गायन करतो

आज्ञा ताईची घेऊन

बाबा चरणी ठेवून मस्तक

करतो वंदन ।।१२।।


Rate this content
Log in