STORYMIRROR

Vijay Sanap

Tragedy Others

4  

Vijay Sanap

Tragedy Others

।। परतीचा पाऊस ।।

।। परतीचा पाऊस ।।

1 min
475

।। परतीचा पाऊस ।।

परतीच्या पावसानं

केला बळीचा रे घात

आला अवकाळी पूर

केली शेतीवर मात ।।

जलमय झालं रान

पाणी घराला भिडलं

सरीवर  सरी  नाचे

पिक उभच सडलं ।।

आले मक्काला ही कोंब

बाजरीला फुटे मोड

सारी दु:खात दिवाळी

नाही झाले लाडू गोड ।।

धुंंद होवून नाचला

गेली गळून रे पानं

चार लेकरं घरात

नाही कणगित दानं ।।

परतून जाय बापा

नको घालूस धिंगाणा

बळी पाहे उकरुन

भूईआड  शेंगदाणा ।।

परतीच्या पावसा तू

आता नको आणू आव

नदी नाले एक झाले

गेलं पाण्याखाली गाव ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy