मी दगड
मी दगड


मी काळ कुट्ट पाषाण
कोण्या मेल्याची नजर
माझ्यावर जडली
त्यानं माझी,
सुंदर मूर्ती साकारली
कोण्या चांडाळानं
शेंदुर मला फासला
अन् माझ्या समोरचं
द्वाडाणं देव कापला
कुणी काय, कुणी काय
सर्वांनी आप आपलं वकलं
त्यांचीअायकुण गार्हाणी
मला माझं कमीच वाटलं