STORYMIRROR

Vijay Kadu

Romance

3  

Vijay Kadu

Romance

विसरायचं म्हणटलं तरी

विसरायचं म्हणटलं तरी

1 min
249

विसरायचं म्हणटलं तरी

सगळंच कसं विसरता येत नाही

कितीही बरी झाली जखम

तरी व्रण मात्र जात जात नाही


   जखमांवर मी माझ्या

    अत्तराचा लेप दिला

    नाव ना तिचे कुठे 

    फक्त फुलांचा सुवास दिला


ओठांना तंबीच अशी दिली

दुखाचे गाणेही ते हसून गालात

बेवफा म्हणु नका तिला

म्हणून दातही जीभेलाच चावतात


    तीन विसरलं सगळ

    विसरून जा म्हणून मला

    कसं सांगू वेडीला 

    जगायचं सोड म्हणते मला


विसरायचं म्हणटलं तरी

असं सगळंच विसरता येत नाही

जिवापाड केलं प्रेम

असं अर्ध्यावर सोडता येत नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance