कुंडली
कुंडली
विरोध नाही कुणाचा
तुझ्या माझ्या लग्नाला
रेशीम गाठीला
प्रेमाच्या बंधनाला!!१!!
घरचे माझे राजी
तुझ्याही घरच्यांचा होकार
सर्वकाही जुळतयं
मात्र कुंडलीचा मिळतो नकार!!२!!
नाही मंजूर मला
दुसरं कुणाची साथ
सखे फक्त हवा मला
तुझाच विश्वासाचा हात!!३!!
तू माझा श्वास
जगण्याची आस
तुझ्या शिवाय सखे
जीवन आहे भकास!!४!!

