का लपवतेस
का लपवतेस
तू पाहतेस, तू लाजतेस
हसतेसही तूच
प्रेेम करतेस माझ्यावर
मग का लपवतेस?
घरच्यांना घाबरतेस
मैत्रीणींपासून लपवतेस
आवडतो मी तुला तर
मनातल्या मनात का झुरतेस?
अशी तू लाजू नकोस
घरच्यांना घाबरु नकोस
साथ देईन जन्माची
आता मागे तू वळून पाहू नकोस

