STORYMIRROR

Vijay Kadu

Classics

3  

Vijay Kadu

Classics

ये मना

ये मना

1 min
527

ये मना सावर रे

आवर रे आसू

झुगारून दे बंधन

अन् चेहऱ्यावर आण हसू

काय झालं,ते गत आहे

झालं काय,ते तू विसर

त्याचा विचार नको करू

झुगारुन दे बंधन

अन् चेहऱ्यावर आण हसू

तू घडवं वर्तमानकाळ

भविष्यकाळ होईल सुकाळ

नाही सुखाचा अकाळ

आधी तू चालनं तर कर सुुुरू

झुगारुन दे बंधन

अन् चेहऱ्यावर आण हसू

जगी जन्मे ती सर्वी पात्रे

तू तुझाच ठरवं शत्रु की मित्र

येेथे कोण कोणाचं नाही 

तु नको कोणाची आस करू

झुगारुन दे बंधन

अन् चेहऱ्यावर आण हसू

तू एकलाच चालायचं

या खडतर जीवन पथावर

चालून चालून थकून

हातपाय गाळून नको बसू

झुगारुन दे बंधन

 अन् चेहऱ्यावर आण हसू

तू आलची एकटा

आणि तू जाणार ही एकटा

वेड्या नको मायेेत पडू

नको या संसारात अडकू

झुगारुन दे बंधन

अन् चेहऱ्यावर आण हसू

समर्था वाचुनी नाही

तुझं कोण सदैव सांगती

म्हणून चरण धरू आधी त्यांंचे

बावळ्या  जग हे दिल्या गेल्याचे

झुगारुन दे बंधन 

अन् चेहऱ्यावर आण हसू

कर्माचे हे भोग तुझ्या

येेती सुख दुःखाचे फेरे

चुकवी जे समर्थ स्वामी 

म्हणुनी प्रथम समर्थासी स्मरू

म्हणून झुगारुन दे बंधन

अन् चेहऱ्यावर आण हसू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics