ही वाट दूर जाते......
ही वाट दूर जाते......


माणुसकीची वाट .......
आज दूर जात आहे !
माणूस माणुसकीपासून ....
नातं तोडत आहे !!
कोवळ्या कळ्या रोज ;
येथे खुडल्या जातआहेत ....
बलात्कार अत्याचार ;
रोज येथे होतआहे...
माणसांमधले पिशाच ;
जागे होऊन सैराट होतआहेत....
माणसांमधले नराधम ;
नारीचीअब्रू वेशीवर उधळतआहेत ...
अच्छे दिनाचे नको ......
आता असे नवे दाखले !
जुने महापुरुषही आता .....
जाती धर्मात हो वाटले !
बेटी वाचवा कशाला?
वासनेला भोगवाटा?
दुर्गेची पूजा कशाला ?
नीतिमत्ता संस्कारफक्त राखा!
माणूस म्हणून जगूद्या.......
मनं करा ओल्या संवेदनांची!
नको ते धर्म नको त्या जाती !
एकच वाट चाला माणुसकीची !!