आता वाटते.....
आता वाटते.....


चवढव फोडण्या बिड्ण्या पीठंबिठं किसण्या बिसण्या
करणं थोडं बोलणं फार, खूप झाला फुगावा
“स्वयंपाक छान करतात हे” पसरू दिली उगाच अफवा
आता वाटते खरच एकदा चहा करून बघावा
भेंड्या खेळता खेळता गाऊ लागलो गाणी
सूर तालाचे व्याकरण, खयाल ठुमऱ्या रागिणी
“क्या बात ही, वाहवा, झब्बा लेंगा मैफिली
आता वाटते खरच एकदा षडज लाऊन बघावा
नुसते
चाळले होते विवेकानंद, बरेच समजले असा भ्रम झाला
“कोळून प्यालाय हा” म्हणत मित्रांनी पण कहर केला
येता जाता उदाहरणे, दृष्टांतांचा प्रसाद वाटला
आता वाटते खरच एकदा कर्म योग उघडून बघावा
ध्यान धारणा योग साधना चर्चा वाद खूप केले
चटकदार गोष्टी सांगून टाळ्या घेत भाषणही दिले
सुप्त मन , जागृत कुंडली, डोक्यावरून पाणी गेले
आता वाटते खरच एकदा ओमकार तरी लाऊन बघावा.