पहिला दंडवत माझा
पहिला दंडवत माझा


मराठी अनुवाद ....
मूळ गुजराती कविता … परथम परणाम मारा .. कवी "शेष" … राम नारायण पाठक (१८८७-१९५५)
पहिला दंडवत माझा
दंडवत पहिला, सांगा माह्या मायला, दगडात तिला कसा हिरा हो दिसला
स्वतः राहिली उपाशी, आनी घातला मायेचा घास, तिने माह्या पोटाला
दंडवत दुसरा, सांगा माह्या बापाला, बोट धरून त्याचे, मी उंबरा वलांडला
दुनियेच्या बाजाराचा, रंग त्येनं दावला, डोंगरावरी देवळात माथा टेकवविला
दंडवत तिसरा, सांगा हो गुरुमाउलींना, नकळता कळता, त्यांनी पाठ घोटवला
एक नोहे, अनेकांच्या पडतो मी पाया, आत्मा-परमात्म्याचा, जोड ज्येंनी दावला
दंडवत चवथा, सांगा माझ्या मैतरांना, त्येंच्या संग, एकोएक रंग हो खेळला
भांडलो जगाशी खांदा देऊन खांद्याला, हसविले, त्यांनी, केले हलके दु:खाला
दंडवत पाचवा, सांगा माह्या त्या वैऱ्यांना, दाविले त्यांनी दोष, जे, कोणी मला सांगेना
वेडा, भैताड अशीही, केली त्यांनी संभावना, सत्य रूप दावनारा, झाले हो ते आईना
दंडवत सहावा, सांगा जीवाच्या हो सखीला, तापल्या संसारी, आम्ही तिच्या सावलीला
कसा करावा हिशोब, किती पडावे हो पाया, कसा उतराई होऊ, कळेना माह्या मतीला
दंडवत सातवा, सांगा जी त्या महात्म्याला, केला ढोराचा मानुस, मनी दिवा पेटविला
जगण्याच्या नाना वाटा त्यांनी हो दावल्या, पाया बांधून विचारांचा, मार्ग स्थीर केला.
दंडवत शेवटचा, सांगा हो त्या दुनियेला, मागितलं नाही कांही, खजिना खुला केला
जसे आता पाजले, घेईल पदरात हो ती, जेंव्हा पुन्हा उतरेल, हंस माझा आसऱ्याला
अनुवाद : श्याम नारायण पाठक