कवि
कवि
कवि होणं म्हणजे मूर्ती होणं
भक्त बनलेल्या बांधवांना
मूक आशिर्वाद देणं
त्यापेक्षा मी बंधू, सखाच बरा
कवि होण म्हणजे नवरा होण
बायको झालेल्या प्रेयसीवर
अधिकार गाजवणं
त्यापेक्षा मी रसिक,प्रेमीच बरा
कवि होण म्हणजे मी माझ मिरवण
प्रेम करणाऱ्या सखी ला विसरण
विरह सोसण
त्यापेक्षा मी रसिक,सखाच बरा
........रसिक मी