Click here for New Arrivals! Titles you should read this August.
Click here for New Arrivals! Titles you should read this August.

Anju Metkar

Classics


3  

Anju Metkar

Classics


समिधा...

समिधा...

1 min 176 1 min 176

अस्ताचली पहा तो

दिवाकर निघाला

आक्रसून रश्मींना

दिशा तिमिरात बुडाल्या ।।१।।

ती कातर सांज वेळ

संध्येची मंद छाया

प्रतिबिंबात पाण्याच्या

शोधते सावळ स्वकाया ।।२।।

अलगद चंद्रबिंब विलसे

भाळावरी नभीच्या

नक्षत्रस्वामी ही तरसे

मिठीत नीशेस कवळण्या ।।३।।

थरथरे श्वास नीशेचा

पाहूनी रजनीवराच्या अभिनीवेशा

कसे कथावे गुज मनीचे

शब्दातीत भावनांच्या सुरम्यशा ।।४।।

परिमळ गंधीत रातराणीचा

सहज श्वासात भिनतो असा

साक्षीने तबकातील नक्षत्रज्योतींचा

ओवाळून सांगू मनीचा भाव कसा।।५।।

धडधड उरी वाढे

ती वैरीण प्रीत मनी जडे

मी कोण जोगीण गडे

मज कैवल्याची मिठी पडे ।।६।।

अभिलाशांच्या समिधा

हवनी समर्पिते परी मन द्वीधा

सखे मज झाली सावळबाधा

कुणा सांगू ही कथा सुधा ।।७।।

क्षितिजापल्याड जेथे

सरितासागर संगम तेथे

मी बंधपाश झुगारते

निजधामा मी आकळते ।।८।।


Rate this content
Log in

More marathi poem from Anju Metkar

Similar marathi poem from Classics