STORYMIRROR

Anju Metkar

Tragedy

3  

Anju Metkar

Tragedy

आठव

आठव

1 min
106

आई बाबांचा 

आठव होताच

एकलेपणाचे कढ

ह्रदयी उमटतात

अबोध नेत्र

आकाशाकडे झेपावतात

घडल्या प्रमादांचे

उःशाप मागतात।।१।।


पापपुण्याच्या हिशेबाच्या

खैराती स्मरतात

कुठल्या जन्मीचे 

भोग विव्हळतात

अवचित दोन्ही

कर जुळतात

सग्यासोयर्यांचे 

क्षेमकुशल इच्छीतात ।।२।।


ओठांची महिरप

घट्ट आवळता

अंतरी भावनांचे

तरंग उमटता

भावविभोर मनीची

अस्थिर विफलता

उरी काहूर

स्पंदनी अधीरता ।।३।।


आठवांच्या 

गावी विहरता

पाउले बोजड

होऊनी बधीरतात

विषण्ण मनाची

अबोल कातरता

अन् सांजवेळी

मन हुरहुरता।।४।।


डोह नयनांचे

भरुनी वहातात

कारणावीण

झरझर पाझरतात

मिटल्या चक्षुंपुढे

सहज तरळतात

भाव मनीचे

उन्मळून गळतात ।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy