STORYMIRROR

Anju Metkar

Inspirational

3  

Anju Metkar

Inspirational

पदर मायेचा

पदर मायेचा

1 min
173

तिच्या मायेचा पदर

कधी फाटतच नाही

तिचे कोकरावरचे प्रेम

कधी अटतच नाही

नऊ महिने वाहिलेला

गर्भ भार तिला वाटतच नाही

शी शू ने भरलेल्या दुपटी अन् लंघोटांची

घृणा मनी कधी दाटतच नाही

तिच्या मायेचा पदर कधी फाटत च नाही ||१||


खोड्या आणि मस्तीची 

त्रस्तता कधी भेडसावत च नाही

लेकराला तळहातावरील फोडाप्रमाणे जपताना

ती कधी थकतच नाही

तिच्या मायेचा पदर कधी आटत च नाही ||२||


बोबडे बोल असो वा भांडून उच्चारलेले अपशब्द

तिचे कान कधी किटतच नाही

कल्याणम् अस्तु च्या अशिषांची माळ

जपता हात थांबतच नाहीत 

तिच्या मायेचा पदर कधी फाटत च नाही||३||


लेकरांच्या सुदृढ यशस्वीतेसाठी

देवाकडे मागणं संपतच नाही

दातृत्वच जाणणारा हा मायेचा स्पर्श

कधी कठोर काटेरी होतच नाही

तिच्या मायेचा पदर 

कधी विरतच नाही

तिचे लेकरावरचे प्रेम कधी आटत च नाही ||४||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational