STORYMIRROR

Anju Metkar

Tragedy

3  

Anju Metkar

Tragedy

ती

ती

1 min
927

दीसतो तिचा रुसवा तिची भांडण 

तिच्या अपेक्षा ठेवणे दीसते तिचं हक्क गाजवणे तिचं रागावणे आणि चिडीला येणे

वाटते तीस्वमग्न,आक्रस्ताळी, आक्रमक

स्वार्थी, लोभी आणि गर्वांध


भासते ती घरफोडी, निर्लज्ज ,निर्ढावलेली

रागिट, द्वेषी, अहंकारी, आत्मभान हरपलेली

पण तिच्या त्यागाची महती नसते तुम्हाला समजलेली

आपल्यांच्या आपलेपणात ती असते गुरफटलेली


स्वजनांच्या सुखासाठी ती सदैव असते झपाटलेली

स्वकीयांच्या आत्मप्रौढीत तिची सदैव कुतर ओढ झालेली

नात्यांच्या भावविश्वात गांधारीगत अंतर्मूख झालेली

ती असते जगासाठी दृष्टीहीन, वाचाहीन, संवेदनाहीन 


तिच्या अंतःकरणात मात्र आतोनात खळबळ माजलेली

घराण्याच्या नावाखातर तीने कुंती द्रौपदीची शाल पांघरलेली

आतून असते उद्ध्वस्त अपमानांनी पोखरलेली

वरवर फसवं हसत जगाला वाकुल्या दाखवत

आतून मात्र कोसळलेली, पूर्णतः संपलेली... पूर्णपणे ढासळलेली.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy