Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Anju Metkar

Tragedy

3  

Anju Metkar

Tragedy

स्त्री

स्त्री

1 min
156


तिचं अस्तित्वच असते

एक करूण कहाणी

तिच्या नयनी तरळणारं 

कुणालाही दीसत नसते पाणी

तिच्या मनी उठणा-या भावतरंगाना


कुणीच नसते घालणारे खतपाणी

ह्रदयात पाझरणाऱ्या अमृताला

नसतात सिंचन करणारे नावाडी कुणी

तिच्या कष्टाळू आयुष्याची

नसते कुणाला फिकीर वास्तवपणी


तिच्या कार्यमग्न कर युग्मकांना

नसतोच साथ देणारा सहचारी गुणी

अपेक्षांचे ओझे तिच्या मानगुटीवर

कायमच तिने असावे कर्तव्य तत्पर मृदूभाषिणी


भाळलेले असतात सारे तिच्या चंचलनयनांवर सौंदर्यखाणी

पण कधीही कुणाला दीसत नाहीत

तिची ओढग्रस्त पाऊले अनवाणी

तिच्या अंतरीक तळमळीला


फुलवणारा जाणकार नसतो माळी कुणी

खुलवून तिच्या भावविश्वाला

चितारणारा जादूगार झणी

स्त्री जन्मा हीच तुझी असे जीवनविराणी


नकोस होऊ कष्टी 

दावुनी दुनियेला तव शक्ती फणी

तुच असशी सबले दुर्गा दुर्गम दूर्गार्तिहारीणी....।।



Rate this content
Log in