Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anju Metkar

Others

3  

Anju Metkar

Others

माऊली

माऊली

1 min
128


कारे सावळ्या यंदाही चुकवलीस वारी

वारकर्यांच्या झुंडीतील भक्ती का पडली अपुरी

सांग ना माझे विठाई

का अव्हेरलीस भक्तिरसातील माधुरी ।।१।।


आषाढ मेघाच्या सांगाव्या बरोबरी

मृदुंग टाळ चिपळ्यांची केली जमवाजमव सारी

भक्तीच्या तुळशीवृंदावनातील बावरी

मुक झाली रे वैखरी ।।२।।


संतसमागमाचा लाभ तुझ्या रे दारी

युगे अठ्ठावीस उभा तू विटेवरी

दोन्ही करकमळ ठेवोनी कटेवरी

उभा जगजेठी अहर्निश पंढरपूरी ।।३।।


मम पातकांचे आक्रीत हे फळलं

महामारीभयास्तव तव भेटीस आकळलं

पण विठ्ठला तव पदांपासून नाही रे ढळलं

तुझाच ठाव ह्रदयी हे पुरतचं कळलं ।।४।।


कधी ठाकलास तू रुग्णसेवी तत्पर

कधी खाकी वर्दीतील तू नियमनिष्ठुर

कधी स्वच्छतेची धुरा खांद्यावर

कधी लढतोस शत्रूसंगे सीमेवर ।।५।।


ठायीठायी कार्यमग्न उभा तूच कर्मभूमीवर

वाढवुनी विश्वास माणसातील माणुसकीवर

देवा किती शिणवलास देह आमच्या खातर

दाविलीस प्रचिती भक्तीच्या कसोटीवर।।६।।


पुढल्या बारी घडू दे वारी

नको रुसु बा आमच्यावरी

बापाने करू नये रे चाकरी

हीच जनरीत बरी बा श्रीहरी ।।७।।


तुझ्या नामसंकीर्तनाची आस

हीच असे निर "लस "भक्ती खास

स्पर्शता चंद्रभागेच्या जलास

रोगसंक्रमणाचा घडो ह्रास ।।८।।


भक्तिरसाचा मळा फुलवेन दारी

ओठी नामामृताची झारी

अलिंगता तव पदकमलास श्रीहरी

जीवशीवभेटीची खुमारी ।।९।।


माऊली तव भेटीचा जागर

करी मजवर कृपापाखर

व्दैत अव्दैताचे माहेर

विठुराया तव पंढरपुर।।१०।।


Rate this content
Log in